Government News : मागच्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने नोटाबंदी केली होती. आणि सगळ्यांचेच तारांबळ झाली होती. मध्यरात्रीमध्ये केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. व संपूर्ण देश त्या निर्णयामुळे हादरला होता. यामुळे अनेकांचे काळा पैसा वर आला व प्रकरण उघडकीस आला. या सरकारच्या निर्णयाला काही लोकांनी निषेधही व्यक्त केला. त्यावेळी सरकारने 500 व हजारच्या नोटा बंद केलत्या.
पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे बाजारात नवीन 2000 च्या नोटा तयार झाल्या. पण गेल्या काही दिवसांमध्ये बाजारात गुलाबी रंगाची 2000 ची नोट दिसणे म्हणजे दुर्मिळ झालेले आहे. अगदी कुठेही आपण गेलो एटीएम मध्ये सुद्धा गेलो तरी 2000 ची नोट मिळत नाही. 2000 ची नोट राहिलीच नाही अशी अफवा पसरवली जात आहे. यावर सरकार कोणतीही भूमिका घेत नाहीये.
सुशील कुमार मोदींनी काय केला दावा ?
सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या या दाव्यानुसार गेल्या काही वर्षात भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. त्याचप्रमाणे दोन हजार रुपयांच्या खोट्या नोटा ही आजकाल तयार होताना दिसत आहे. काही लोकांनी दोन हजार रुपयांच्या नोटांचा साठा केला आहे. नोकिया नोटेचा वापर केवळ अवैध धंद्यात करत आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी 2000 नोटा या ब्लॅकने विकल्या जात आहे.