अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लक्ष रूपयांपर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता बारावी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा.
शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम :
राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम – आरोग्य विज्ञान – MBBS,BDS,BAMS,BHMS,B.Pharm, व संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिकी – B.E, B.Tech., B.Arch (सर्व शाखा ), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम. व्यावसायिक अभ्यासक्रम – LLB , हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA,MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम. कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान – Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc.इ संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.
परदेशी अभ्यासक्रम – आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम. education loan
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
लोकप्रिय योजना
- विहिरीसाठी मिळणार आता 4 लाख अनुदान,इथे करा ऑनलाइन अर्ज | Subsidy 4 lakh now for irrigation wells
- गाय व म्हैस घेण्यासाठी मिळणार 85 हजार रुपये, इथे करा अर्ज | Farming Scheme 2024
- खत आणि बियाण्यांच्या तक्रारीसाठी व्हॉट्सऍप क्रमांक प्रसारीत, सेव्ह करुन घ्या..!
- या उन्हाळ्यात लाईट बिल होणार अर्धे | फक्त ही एक सेटिंग करा
- मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे!