Ancestral Land Property वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा हिस्सा किती? पहा संपूर्ण माहिती

गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇

मुलीचं लग्न झाल्यास काय?

Indian property law for married daughter : आधी मुलींना केवळ कुटुंबाचा सदस्य मानलं जात होतं, मात्र संपत्तीमध्ये समान वारसाचे अधिकार नव्हते. मुलीचं लग्न झाल्यावर तर तिला माहेरच्या घरचा सदस्य देखील मानलं जात नव्हतं. मात्र, 2005 मध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारस मानलं जातं. मुलीचं लग्न झालं तरी मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार आबाधित राहतो.

मुलीचा जन्म 2005 पूर्वीच असेल आणि वडिलांचा मृत्यू झाला असल्यास काय?

हिंदू वारस कायद्यानुसार (दुरुस्ती) 2005 मुलीचा जन्म हा कायदा लागू होण्याआधी झालेला असू अथवा नंतर याने काहीही फरक पडत नाही. वडिलांच्या संपत्तीत मुलींचा मुलांइतकाच समान अधिकार असेल. मग ही संपत्ती वडिलोपार्जित असोकी स्वकमाईची असो. मात्र, वडिलांचा मृत्यू हा कायदा लागू होण्याआधी झाला असेल तर मात्र अशा मुलींना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार सांगता येणार नाही. त्यांच्या संपत्तीचं वाटप वडिलांच्या इच्छापत्रानुसारच होईल



लोकप्रिय योजना



गरजू लोकांपर्यंत ही पोस्ट नक्की पाठवा 👇